📜 १९६७ पूर्वीचे महसुली अभिलेख शोधा

कुणबी प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेले ऐतिहासिक दस्तऐवज ऑनलाइन कसे शोधावेत याची मार्गदर्शिका

स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

  1. https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या
  2. "Sign in with OTP" वर क्लिक करा
  3. मोबाईल नंबर व आलेला OTP टाकून लॉगिन करा
  4. अभिलेख पाहण्यासाठी कार्यालय निवडा (तहसील / सिटीसर्व्हे / डेप्युटी SLR)
  5. पुढे जिल्हा → तालुका → गाव निवडा
  6. हवे असलेले दस्तऐवज निवडा: खसरा / ७/१२ उतारा / Mutation Records
  7. गट क्रमांक / सर्व्हे नंबर टाकून शोधा
  8. ✅ उपलब्ध असलेली जुनी कागदपत्रे स्क्रीनवर दिसतील
टीप: १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वीची अभिलेख नोंदी कुणबी प्रमाणपत्रासाठी सर्वात महत्वाचा पुरावा मानल्या जातात.

मार्गदर्शक व्हिडिओ

👉 व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रक्रिया दाखवली आहे. कृपया काळजीपूर्वक पहा.

महत्वाची माहिती

काय शोधावे:
  • खसरा पत्रक
  • ७/१२ उतारा
  • Mutation Records (Old Mutation)
  • क-पत्रक/कुळ नोंदवही
  • नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर १९५१
काय करावे:
  • स्क्रीनशॉट घ्या
  • प्रिंट करा
  • Certified Copy मागा
  • सुरक्षित ठेवा
  • अर्जासोबत जोडा